Search This Blog

Sunday, December 5, 2010

भेट

एकदा अचानक दाटून आलं सगळं,
पक्षी अचानक घरट्याकडे निघाले ,
भर दुपारी काळोख पसरायला लागला ,
त्या काळोखान इतक घट्ट धरलं सगळ्यांना ,
कि मनात अचानक उदास वाटायला लागलं ,
कुणीतरी आठवायला लागलं ,
आणि स्वतःला खूप वेळ आवरून धरल्यावर ,
आता त्याला अवरेच ना आणि त्यांनी एकदम कोसळायला सुरवात केली ,
धो धो करत बरसू लागला ,
मन मोकळं ... अगदी मोकळं करून ,
काही वेळाने त्याचा जोर जरा कमी झाला आणि ,
प्रकाश वाढायला लागला ,
पक्षी घरट्या बाहेर येऊन डोकाऊ लागले ,
नुकत्याच धुतलेल्या पानांवरून चक्कर मारून आले ,
पहिलाच पाऊस पाहिलेल्या चिमणीच्या पिल्लाने आपल्या आई ला भीतभीत विचारलं ,
आई हे सगळ काय होत गं ?
आई म्हणाली , काही नाही रे ... आठ महिन्यांनी भेटला न पाऊस जमिनीला म्हणून त्याला भरून आलं होतं .
रंग दे

4 comments: