मागे वळून बघायची सवय अजून जात नाही,
सतत अस वाटत की काहीतरी राहिलंय मागे,
पण काहीतरी राहिलंय येवढ नक्की ,
जाणवतंय... पण कळत नाही,
किवा कदाचित कळतंय,
पण समजून घ्यायचं नाही,
गोंधळ गोंधळ गोंधळ सगळा,
कित्तेकाना हा माझा प्रोब्लेमच वाटतो,
मलाही,
पण या वेळी मात्र मी ठरवलंय,
अस वाटल की काही राहिलंय,
तरीपण मागे वळून नाही बघायचं,
राहील असेल तर राहील असेल,
हो ना, किती विचार करायचा त्याचा,
---------------------------------------
बघा अस होत, विचार नाही करायचा म्हटलं,
तर पुढची ओळ सुद्धा सुचत नाही,
गोंधळ गोंधळ गोंधळ सगळा.
रंग दे
No comments:
Post a Comment